Type Here to Get Search Results !

धनादेश प्रकरणी कोलगावच्या इसमास दोन महिन्याचा कारावास

धनादेश प्रकरणी कोलगावच्या इसमास दोन महिन्याचा कारावास

🔸धनादेश अनादर प्रकरण
🔸५५ हजार रुपयाची नुकसान भरपाईचा आदेश
🔸मारेगाव न्यायालयाचा निकाल
मारेगाव : दिपक डोहणे 
मारेगाव येथील पतसंस्थेचे कर्ज उचल करून कर्जाची परतफेड न करता धनादेश देऊन तो अनादर झाल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट झाले.त्यावर मारेगाव न्यायालयाने निकाल देत मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील इसमास २ महिन्याचा कारावास व ५५ हजार रुपयांचा नुकसान भरपाईचा आदेश दिला.मारेगाव न्यायालयाने दिलेल्या निकालाने कर्ज बुडविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

रामदास झित्रुजी तलांडे रा.कोलगाव असे शिक्षा झालेल्या कर्जदाराचे नाव आहे.त्यांनी रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत वणी शाखा मारेगाव येथून कर्जाची उचल केली होती.मात्र कर्जाची रक्कम न देता संस्थेला धनादेश दिला होता.त्यांच्या खात्यात रक्कम नसल्याने धनादेश अनादर झाला.त्यामुळे संस्था कर्मचारी गोविंद ढवस यांनी न्यायालयात धाव घेत प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

यात मारेगाव न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्री.निलेश पी.वासाडे यांनी दोन्ही बाजूंचे पुरावे आणि युक्तीवाद ऐकून आरोपी तलांडे यास धनादेश प्रकरणी दोषी ठरवून दोन महिन्याची शिक्षा व ५५ हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश दिला.तसेच नुकसान भरपाईची रक्कम पतसंस्थेत अदा न केल्यास पुन्हा एक महिन्याच्या शिक्षेचा आदेश दिला.सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे अँड.परवेज पठाण यांनी न्यायालयात बाजू मांडली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies