कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
🔹गणेशपूर पेट्रोलपंप नजीकची घटना
गावाकडे परत जाणा-या व्यक्तीचा गणेशपूर जवळील पेट्रोल पंप जवळ अपघात झाल्याची घटना दि.०३/०२/२०२२ ला संध्याकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली या मध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून . त्याला उपचारा करिता ग्रामीण रुग्णालयात वणी दाखल करण्यात आले .
अशोक झाडे अंदाजे वय ५२ वर्ष हे अहेरी बोरगाव ता.वणी येथील रहिवाशी आहे.हे घोन्सा येथे कार्यक्रमानिमित्त गेले होते.गावाकडे परत येत असतांना गणेशपूर पासून १ कि.मी अंतरावर असलेल्या पेट्रोल जवळ भरधाव येणाऱ्या कारने त्यांचा (Mh 29 AQ7414) दुचालीला जबर धडक दिली आणि घटना स्थळावरून पळ काढला यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून .
घटनास्थळाजवळच गणेश गोहोकर, विनम्र कुईटे, सुधीर दुधलकर, निखिल मुत्तलवार, स्वप्निल कांबळे हे उभे होते. अपघात झाल्याचे कळताच त्यांनी रस्त्यावरून जाणारा एक ऑटो थांबवला व त्यात टाकून जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.