Type Here to Get Search Results !

वीज महावितरण कंपनी च्या गलथान कारभाराने तरुण शेतकरी अर्धवट जळाला

वेदनादायी...

वीज महावितरण कंपनी च्या गलथान कारभाराने तरुण शेतकरी अर्धवट जळाला

🔸मारेगाव तालुक्यातील मजरा येथील घटना
🔸दोषीवर कार्यवाही करण्याची नातेवाईकांनी केली मागणी


मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील मजरा (हिवरा) येथील ४५ वर्षीय तरुण शेतकऱ्यांला विजेचा धक्का लागल्याने शरीराच्या विविध भाग अर्धवट जळाला आहे. ही घटना शनिवारला दुपार च्या सुमारास घडली.

मजरा (हिवरा) येथील रहिवासी सुभाष रामचंद्र पिंगे असे विजेचा शॉक लागून जळालेल्या इसमाचे नाव आहे. सुभाष आपल्या शेतात गेला असता त्याला विजेचा जबरदस्त धक्का लागला. यात त्याच्या शरीराच्या विविध भाग जळाला असल्याची माहिती आहे. घडलेल्या घटनेबाबत त्यांच्या कुटुंबियातील निकटवर्तीयांनी वीज महावितरण कंपनी चा दोष देत आरोप केला आहे. सदर परिसरात विजेचा दररोज रात्रीला पुरवठा करीत होती, काल पिंगे यांच्या शेतातील डीपी चा फ्युज गेला होता, याबाबत त्यांनी त्या परिसरातील लाईनमनला फ्युज टाकून देण्यात यावे अशी सूचना करून सांगितले. परंतु लाईनमनने घुमजाव करीत आले नाही, दोन दिवस सिंचन झाले नसल्याने शेवटी पिंगे यांना स्वतः रोहित्रात फ्युज टाकावा लागला. अशातच दिवसाला कायम बंद राहणारा वीज पुरवठा सुरु झाला. त्यामुळे सुभाष यांना शॉक लागला आणि ते दूरवर फेकले गेले. यात ते मोठया प्रमाणात जळाले गेले असल्याचे माहिती आहे. परिणामी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांचे नातेवाईक किशोर पिंगे यांनी केली आहे.दरम्यान , जखमी शेतकऱ्यावर वणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies