वेगाव कबड्डी सामन्यात बल्लारपूर अजिंक्य
🔸️२२ संघांनी घेतला होता सहभाग
श्री संत जगन्नाथ बाबा स्पोटींग क्लब वेगांव व्दारा आयोजित भव्य कबड्डीचे खुले सामने आयोजित करण्यात आले होते.यामध्ये जवळपास 22 संघांनी सहभाग नोंदवला होता.झालेला रंगतदार कबड्डी सामन्यात प्रथम पारितोषिक पाथर्डी क्रिडा मंडळ बल्हारशाह .यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक भीम क्रिडा मंडळ भोपाल यांनी पटकावले व तृतीय क्रमांक नवरंग क्रिडा मंडळ वणी आणि चौथे पारितोषिक श्री संत जगन्नाथ बाबा स्पोटींग कल्ब वेगांव यांनी पटकावले.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य मा.श्री अनिल देरकर सरपंच सौ मालाताई गौरकार तसेच गावातील प्रमुख मान्यवर यांची उपस्थिती होती. विजयी संघांना सन्मान चिन्ह आणि मान चिन्ह देऊन विजय गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किंगरे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत जगन्नाथ बाबा स्पोर्टींग क्लब वेगांव मंडळाचे पदाधिकारी आणि वेगांव ग्रामवासी नी सहकार्य केले.