अपघात....
भीषण अपघातात चिंचमंडळ येथील युवक जागीच ठार
🔸वडनेर येथे घडली दुर्देवी घटना
🔸दुचाकीही चक्काचूर
वडनेर ता.हिंगणघाट येथून परतीचा प्रवास करणाऱ्या दुचाकीला ट्रकने चिरडल्याने चिंचमंडळ येथील युवक जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना शनिवारला दुपारी घडली.या भीषण अपघात मोटारसायकलचा चक्काचूर झाला.दरम्यान अपघाती घटनेने चिंचमंडळ येथे शोककळा पसरली आहे.
योगेश विनायक भोयर (२०) असे भीषण अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.अल्पभूधारक शेतकरी असलेला शेतकरी हा गुरांचे वैरण आणण्यासाठी वडनेर परिसरातील ग्रामीण भागात टेम्पो भाड्याने पाठविला होता. वैरण घेऊन टेम्पो समोर निघाला. अशातच तो मागावून स्वतः दुचाकीने निघाला असता वडनेर चौफुलीवर शिरसगाव येथे ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार चाकात घुसला आणि त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच गतप्राण झाला.
परिणामी मृतकाच्या पश्चात वृद्ध आई, वडील, एक भाऊ , एक बहिण असून या अपघाती घटनेने चिंचमंडळ येथे शोककळा पसरली आहे.