खळबळजनक...
२१ वर्षीय नराधमाचा ५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार
🔸लैंगिक अत्याचारासह पोक्सो व अँट्रासिटीचा गुन्हा दाखल
🔸नराधमास बेड्या
🔸किन्हाळा येथे संतापजनक घटना
खेळाबागडण्याच्या कोवळ्या वयात खाऊच्या आमिषाने विकृत मानसिकतेचा अंमल करीत मारेगाव तालुक्यातील किन्हाळा येथील २१ वर्षीय युवकाने केवळ पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारला घडली.परिणामी नराधमावर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल करून बेड्या ठोकल्या आहे.सामाजिक भान हरविलेल्या या घटनेने नराधमाप्रती सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
निलेश राजू टोंगे रा.किन्हाळा असे संशायित नराधमाचे नाव आहे. त्याच्या घराच्या काही अंतरावर पिडीत बालिकेचे घर आहे.खेळणे बाडगण्याच्या कोवळ्या वयात तिला दुपारच्या सुमारास नराधमाने खाऊ चे आमिष दाखवीत एकटाच असतांना स्वतःच्या घरात बोलाविले आणि सामाजिक भान हरवलेल्या नराधमाने तिला ओरबडले.सायंकाळी पिडितेला लघुशंकेचा असह्य त्रास होवू लागल्याने दुसऱ्या दिवसाला वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर ही गंभीर उघडकीस आली.
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुल्लजवार यांना घटनेची माहिती देताच रुग्णालय गाठले.घडलेल्या प्रकारचे गांभीर्य ओळखून सदरील प्रकरण मारेगाव पोलिसात वर्ग करण्यात आले.पिडीत बालिकेच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशायित नराधम आरोपी निलेश राजू टोंगे यांचेवर लैंगिक अत्याचार , पोक्सो सह अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करून शनिवारला अटक करण्यात आली आहे.किळसवाण्या कृत्याने नराधमाप्रती प्रचंड संताप व्यक्त होत आहे.