Type Here to Get Search Results !

मारेगावच्या राजकारणात जबरदस्त धक्कातंत्र..... नगराध्यक्षपदी सेनेचे डॉ.मनीष मस्की

मारेगावच्या राजकारणात जबरदस्त धक्कातंत्र.....
नगराध्यक्षपदी सेनेचे डॉ.मनीष मस्की

🔸कांग्रेसचे दोन नगरसेवक अनुपस्थित
🔸बंडखोर उमेदवार दिल्याने काँग्रेसचा अतिआत्मविश्वास नडला
मारेगाव :- दीपक डोहणे
सर्वांचे लक्ष लागलेल्या मारेगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या काँग्रेस पक्षाच्या स्वगृहातूनच अनुपस्थितीचा भेदक मारा बसल्याने बहुमताचा आकडा गोल झाला.शिवसेना व भाजप युतीचा बहुमताचा आकडा फुगल्याने सत्ता काबीज करीत सेनेचे डॉ.मनीष मस्की नगराध्यक्ष पदी विराजमान झाले.

सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्ष सत्तेचे सूत्र हाती घेण्याची व्युव्हरचना आखत मनसे, राष्ट्रवादी ला सोबत घेऊन मारेगावचा सम्राट म्हणून बंडखोर उमेदवार यांची उमेदवारी दाखल करण्यात आली.या युतीला बहुमताचा नऊ चा आकडा सत्तेजवळ नेणार होता.मात्र 'बंडखोर' उमेदवारीने खुद्द काँग्रेस नगरसेवकांची घुमसट मागील काही दिवसांपासून वाढत होती.अखेर काँग्रेसला घरचा अहेर देत नगरसेवक थारांगना खालिद पटेल व आकाश बदकी हे ऐन निवडीच्या दिवसाला गैरहजर राहिले. त्यामुळे ही युती अवघे सात नगरसेवक घेत अल्पमतात आली. दुसरीकडे शिवसेना चार व भाजपचे चार युतीचे समीकरण कृतीत उतरवीत डॉ.मस्की यांना तब्बल आठ मते पडून सेनेचे डॉ.मस्की हे मारेगावच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाले.

परिणामी मारेगावात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसचे बडे दिग्गज नेते मागील काही दिवसांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सत्तेचे समीप करीत होते.मात्र दोन नगरसेवकांनी जबरदस्त धक्कातंत्र दिल्याने या नेत्यांवर चिंतनाची वेळ आली आहे.डॉ.मस्की यांच्या निवडीने शिवसेना कार्यालयात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तर काँग्रेस कार्यालयात सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट होते , अवघ्या वेळातच कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला खेमा मोकळा केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies