राजकीय ब्रेकिंग....
मारेगाव तालुका शिवसेना प्रमुख संजय आवारी यांचा राजीनामा
🔸नगराध्यक्ष निवडणुकी नंतरच्या तात्काळ राजीनामाने वेगवेगळ्या चर्चेला उधान
दोन दिवसांपूर्वी मारेगाव नगराध्यक्षाची निवडणूक पार पडल्यानंतर मारेगाव तालुका शिवसेना प्रमुख यांनी कौटुंबिक कारण देत तड़कफड़की राजीनामा दिला आहे.मात्र राजीनामा बाबत वेगवेगळ्या चर्चेला उधान आले असून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मारेगाव तालुक्यात शिवसेना पक्षाचे एक वेगळे प्राबल्य असतांना पंचायत समिती उपसभापती संजय आवारी यांचेवर पक्षाने 'विश्वास' दाखवीत तालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती.राजकीय क्षेत्रात प्रामुख्याने तालुक्यात पाय रोवत असतांना आवारी यांनी आज बुधवार ला कौटुंबिक अडचणीचे कारण देत जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांचेकडे राजीनामा दिला आहे.
दरम्यान , दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या मारेगाव नगरपंचायततील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीत राजकीय नाट्य घडल्यानंतर तालुका प्रमुखांचा राजीनामास्र वेगवेगळ्या चर्चेला उधाण देत आहे.
आघाडीची बिघाडी कारणीभूत ?
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असतांना स्थानिक स्वराज्य संस्थेत हाच फार्मूला अमलात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. मारेगाव मात्र अपवाद ठरला.सेनेने चक्क भाजप सोबत घरठाव करीत सत्ता स्थापन केली.मात्र काँग्रेसने सेनेला विश्वासात न घेता मनसे , राष्ट्रवादी व अपक्षाच्या बळावर सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे असतांना खुद्द काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी हाणून पाडले.परिणामी वरिष्ठ पातळीवर आघाडीची गांभीर्याने दखल घेण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यामुळेच आघाडीची बिघाडी झाल्याची खमंग चर्चा आहे.