शिवनाळात वाघाचा गायी वर हल्ला
🔸पशुधनास केले जागीच ठार🔸शेतकरी , शेतमजुरात प्रचंड दहशत
मारेगाव :- दीपक डोहणे
बोटोणी जंगलातून आता वाघाने शिवनाळा शिवारात मोर्चा वळवीत एका पशुधनाचा बळी घेतला.ही घटना मध्यरात्री दीड वाजताचे सुमारास घडल्याने परिसरातील शेतकरी तथा मजुरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेकडवाई येथील शेतकरी पंजाब वामनराव पिंपळकर यांची शेती शिवनाळा शिवारात असून ते पशुधनासह झोपडीवजा शिवारात वास्तव्य करीत शेती करतो.काही अंतरावर असलेल्या गोठ्यातील एका पशुधनावर वाघाने हल्ला चढवून ठार केले.इतर जनावरे या घटनेने हंबरडा फोडत असतांना सदर शेतकऱ्यास ही बाब उजेडात आली.दरम्यान दहशतीत आलेल्या शेतकऱ्याने दडी मारून काही वेळात वाघाने घटनास्थळावरून पोबारा केला.
परिणामी या घटनेत शेतकऱ्याचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले असून वन विभागाचे पथक घटनास्थळावर दाखल होत आहे.परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.