शिवजयंतीनिमित्त निबंध स्पर्धा
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विश्वभर साजरी होणार आहे. त्यानिमित्त आवारी ट्युटोरियल्सने निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. निबंधाचा विषय "छत्रपती शिवाजी महाराज" आहे. निबंध स्पर्धा केवळ दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता आहे. निबंध साठी शब्दमर्यादा 250 ते 300 शब्द राहील. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन प्रोत्साहनपर पारितोषिक आणि पुस्तक बक्षीस देण्यात येईल. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यातील कोणत्याही एका भाषेत निबंध लिहिता येईल स्पर्धकांनी निबंध टाईप करून टेक्स्ट मध्ये 98 60 91 50 24 या व्हाट्सअप नंबरवर पाठवावे. निबंधाखाली आपले पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. निबंधाचे फोटो काढून पाठवू नये असे निबंध स्वीकारण्यात येणार नाही. awaritutorials@gmail.com या मेल आयडीवर देखील निबंध पाठवता येतील. आवारी ट्युटोरियल्स, सपना टायपिंग इन्स्टिट्यूटच्यावर, संस्कार झेरॉक्स रोड, लो.टी. कॉलेज जवळ, प्रगती नगर वणी, जिल्हा यवतमाळ 445304 या पत्यावरदेखील निबंध पोस्टाने किंवा प्रत्यक्ष पाठवता येतील. निबंध 14 फेब्रुवारी पर्यंत पाठवावेत. बक्षीस वितरण 19 फेब्रुवारी 2022 शिवजयंतीला होईल. तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.