मार्डी येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
येथील बुद्ध विहार समिति यांच्या वतीने रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचा अध्यक्षपदी सामजिक कार्यकर्ते गौतम तोतडे ,प्रशांत कांबळे , डॉ.प्रशांत पाटील, प्रदीप कांबळे, ॲड आशिष पाटील, नंदू कांबळे,रंजना चंदनखेडे , मेघा भगत, यशोधरा लिहित्कर, कैलासणी कांबळे ,नथू ठमके यासह आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौतम तातेड यांनी रमाई यांच्या जीवनावर मार्मिक शब्दातून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम कोरणा नियमावली चे पालन करून करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.