ओव्हरटेक करतांना दुचाकी एकमेकास धडकल्या
🔸एक ठार , दोन जखमीमारेगाव : प्रतिनिधी
विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीने एकमेकास जबर धडक दिल्याने एक जन ठार तर दोघे जखमी झाल्याची अपघाती घटना आज सोमवारला साडेचार वाजताचे दरम्यान मोठ्या पुलानजीक राज्य महामार्गावर घडली.
प्रकाश शेडमाके रा.मांगुरडा (३६) ता.झरी जामनी असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.तर जखमी मध्ये शेख फहिम शेख मतींन , सय्यद इरफान सय्यद अनवर रा.आदीलाबाद असे जखमींची नावे आहे.
हे दोन्ही दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने जात असतांना दोन ट्रकला ओव्हरटेक करीत एकमेकास जबर धडक दिली.यात एक दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला.तर जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.पुढील तपास सुरू आहे.