शेतकऱ्यांचे क्रुषीपंपाचे वीज कनेक्शन कापने थांबवा - सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर
🔸मारेगाव येथे महावितरण विरोधात छात्रविर सेनेचे धरणे आंदोलन
मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या क्रुषीपंपाचे कनेक्शन कापणे मोहिम तात्काळ थांबवण्यात यावी यासाठी मारेगाव जिजाऊ चौक येथे छात्रविर सेनेच्या वतीने शनिवारला धरणे आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. छात्रविर सेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी यांच्या नैत्रुत्वात करण्यात आला.
सध्या रब्बी हंगाम सुरु असताना महावितरण विभागाने शेतकऱ्यांकडे थकित असलेले विजदेयक वसुली साठी क्रुषी पंपाचे कनेक्शन कापण्याचा सपाटा सुरु केला .त्यामुळे रब्बी पिकांचे प्रमाणात नुकसान होणार याची दखल घेऊन छावा क्षात्रविर सेना मारेगाव तर्फे छावा संस्थापक अध्यक्ष समाधान सुरवसे ,प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी व विदर्भ प्रमुख विलास बुरान महिला प्रदेशाध्यक्ष सौ संगीता ताई डाहूले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष यवतमाळ सतीश पारखी ,जिल्हा अध्यक्ष कामगार सेना राजुभाऊ जुनगरी,जिल्हा उपाध्यक्ष अजय धांडे ,जिल्हा सचिव अनंता घोटेकार,माजी सरपंच तात्याजी पारखी ,पराग निमसटकर,सोमेश्वर पायघन,संकेत लांबट ,पृथ्वीराज घोटेकार ,अभिषेक उपरे,अजय लांबट,प्रतीक अवताडे,श्रेयस सूर यांच्या उपस्थितीत स्थानिक जिजाऊ चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.क्रुषी पंपाचे कनेक्शन कापने मोहीम तात्काळ थांबवावी व शेतकऱ्यांची अवहेलना थांबवावी अन्यथा छात्रविर सेना विजवितरण विरोधात तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी धरणे आंदोलनात दिला आहे.