मुर्धोनी येथे संत रविदास महाराज चौकात पार पडला भूमिपूजन सोहळा
वणी:- प्रतिनिधीसमतेचे पुरस्कर्ते चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या तैलचित्राचा मागील अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभाग, शाखा मुर्धोनी व श्री. संघदिप भगत, जिल्हा परिषद सदस्य, यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मुर्धोनी येथील तैलचित्राचे सौंदर्यीकरण भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद सदस्य श्री संघदिप भगत यांच्या हस्ते दि .०६/०२/२०२२ ला पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रशांत भोज, प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्त समितीचे तुकाराम नीबोट, राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभाग अध्यक्ष रवींद्र धुळे, जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे, उपसरपंच साईनाथ तोडासे, तसेच रामकृष्ण धोटे पोलीस पाटील मुर्धोनी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश धुळे,समाजातील ज्येष्ठ सदस्य संभाजी डूबे, महादेव डूबे, रमेश नवले, शाखेचे अध्यक्ष अमोल डूबे, सदस्य महेश डूबे , किसन कोरडे , श्याम गिरडकर उपस्थित होते. यावेळी रवीद्र डूबे यांनी संत रविदास महाराजांची मूर्ती देण्याची घोषणा केली. तसेच यवतमाळ अर्बन बँकेच्या वणी शाखे तर्फे वणी शाखा साठी 25 खुर्च्या देण्याची घोषणा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रवींद्र धुळे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी गावातील समस्त समाज बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.