Type Here to Get Search Results !

संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त मोक्षधाम मध्ये श्रमदान

संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त मोक्षधाम मध्ये श्रमदान

🔸दिग्रस सोनार समाज बांधवांचा पुढाकार



दिग्रस :-  प्रतिनिधी 
दिग्रस मधील सोनार समाज बांधवानी दि. 19 फेब्रुवारी रोजी संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेऊन दि. 20 फेब्रुवारी रोजी मोक्षधाम मध्ये सामुहिक श्रमदानातून नवा आदर्श निर्माण केला आहे.

कमान गेट परिसरातील दत्त मंदिर येथे संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त सकाळी 9 वाजता समाज बांधवांनी वारकरी संप्रदायातील महान संत नरहरी महाराज यांच्या स्मृतींना उजाळा देऊन सामूहिक अभिवादन केले. यावेळी अतिशय बिकट परिस्थितीतुन संघर्ष करीत सहायक पोलीस निरीक्षक पदी विराजमान होणारे विजय रत्नपारखी यांचा समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून दिग्रस मोक्षधाम येथे श्रमदान केले.

गेल्या अनेक दिवसांपासून मोक्षधाम मधील दुरावस्था पाहायला मिळत होती. परिसरात निरुपयोगी काटेरी झुडपांचे, घाणीचे साम्राज्य पसरले होते. यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्याना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी काही स्वयंसेवक सरसावले होते परंतु येथील परिसराची व्याप्ती पाहता ही जनशक्ती अपुरी पडत होती. त्यामुळे सोनार समाजातील काही युवकांनी संत नरहरी महाराज पुण्यतिथीचे अवचित्य साधून मोक्षधाम मध्ये श्रमदान करण्याचे ठरविले यासाठी सर्व समाज बांधवांनी पाठिंबा देत सर्वांनी सचोटीने श्रमदान केले.

यावेळी सोनार समाज दिग्रस व सोनार सेवा महासंघ दिग्रस चे अध्यक्ष सुरेश शहाणे, उपाध्यक्ष राजेश मुंडलीक, युवा अध्यक्ष सौरभ टाक,सचिव संदीप रत्नपारखी, धनंजय घोडके, सुमित शहाणे, पुरषोत्तम दारव्हेकर , केतन रत्नपारखी, सजंय तिवडकर, जयवंत महामुने , प्रदीप श्रीरामजवार, सुधीर रत्नपारखी, सतिश डहाळे, राजेश नानपिल्लेवार, विजय कागदेलवार, दिनेश बेदरकर, अनिल महामुने, भारत झरकर, सोमेश डहाळे, शशीकिरण कुंडकर, किशोर रत्नपारखी, राजेश साखरकर, अनिल शहाणे, अजय महामुने, कैलास दारव्हेकर, शिव झरकर, सत्यम मोसकुर,रुपेश तळोकार, शरद शहाणे, आदी समाज बांधव उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies