सर्व धर्म समानतेचा संदेश देत शिवजयंती साजरी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ,गायत्री फाउंडेशन दिग्रस तर्फे दिनांक 19 -2 -2022 ला दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत राठोड हॉस्पिटल शंकर नगर दिग्रस येथे,मोफत मधुमेह ,रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सुप्रसिद्ध डॉक्टर उत्तमदादा राठोड (MD LLB PGDEMS) यांनी रुग्णांची तपासणी केली व त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून ,मधुमेह असणाऱ्या रुग्णांना सल्ला देऊन, निदान व उपचार केले.याप्रसंगी जवळपास 120 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण श्रीकांत शर्मा व डॉक्टर उत्तम राठोड यांनी केले व उपस्थितांपैकी आमचे राजे शिवाजी यांनी परस्त्रीचा सन्मान केला होता , त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन गायत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम दादा राठोड यांनी ,मुस्लिम समाजाच्या स्त्रियांचा व सर्व स्त्रियांचा सन्मान करून साडी,चोळी देऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी करून शिबिराची सांगता केली
याप्रसंगी बरेच मान्यवर उपस्थित होते दिलेल्या सेवेच्या संधीबद्दल सर्वांचे गायत्री फाउंडेशन तर्फे आभार मानण्यात आले! याप्रसंगी गायत्री फाउंडेशन चे सर्व सभासद व सचिव सौ विद्या उत्तम राठोड ह्या, प्रामुख्याने उपस्थित होत्या जयंतीनिमित्त डॉक्टर उत्तम दादा राठोड यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशजोत टाकला व उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी हे सुद्धा सांगितले छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मविरोधी किंवा व्यक्ती विरोध नसून ते सर्व धर्म सनमानक होते त्यांनी ,सर्व धर्माचा सन्मान केला !स्त्रियांचा सन्मान केला ,बरेचसे मावळे त्यांचे सरदार हे सुद्धा मुस्लिम समाजातील होते व त्यांनी युवा वर्गांना ,पराक्रमी बना , शूरवीर ,बना, धर्मनिरपेक्ष बना असा उपदेश याप्रसंगी दिला.