Type Here to Get Search Results !

'मागे-पुढे' संकल्पनेवर आधारित साहित्य ठरले स्पर्धेत पुढे !

'मागे-पुढे' संकल्पनेवर आधारित साहित्य ठरले स्पर्धेत पुढे !


कलगाव उर्दू शाळेचे यश



दिग्रस :- प्रतिनिधी 
निपुण भारत अभियान अंर्तगत शिक्षण विभाग पंचायत समिती दिग्रस द्वारा शिक्षकांच्या स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीचे आयोजन देउरवाडा येथे करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील आठही केंद्रातून भाषा व गणित विषयाची प्रत्येकी 3 या प्रमाणे एकूण 48 शिक्षकांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा कलगांवचे उपक्रमशील शिक्षक अताउर रहमान खान यांनी 'मागे, पुढे' या गणितीय संकल्पनेवर आधारित अतिशय अभिनव व नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली होती. आगपेटी, पुठ्ठा या परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून हे शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. या शैक्षणिक साहित्याच्या उपयोगा बाबत उत्कृष्ट सादरीकरण अताउर रहेमान यांनी केले. त्यामुळे तालुकास्तर शैक्षणिक साहित्य स्पर्धेत त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला. त्यानिमित्त प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सभापती अनिता राठोड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, विस्तार अधिकारी शुभदा पाटील, केंद्रप्रमुख हेमंत दळवी, किरण बारशे, गिरीश दुधे, नितीन इंगोले, आकाश घोरपडे, सादिक शेख, जावेद शेख मंचावर उपस्थित होते. अताउर रहमान खान यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कारी निजामोद्दीन , उपाध्यक्ष इमरान कुरेशी, फारूकअहेमद, मौलवी मोहसिन, सै. नज़ीर हुसेन, मोबीनोद्दीन, मो. अश्फाक मुख्याध्यापक नासिर बेग, आमीन चौहान, मुहंमद परसुवाले, सै. गफ्फार, अमीन नौरंगाबादे यांनी कौतुक केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies