मारेगाव तालुक्यात चोरांचा धुमाकूळ
🔸शेतमालासह आता शेती साहित्यांची चोरीछायाचित्र संग्रहित
रब्बी पिकांना पाणी देण्याकरिता बसवलेली विद्दुत मोटार चोरट्याने लंपास केल्याची घटना चिंचाळा तालुका मारेगाव ला सोमवार (दि ०७) ला मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पिकांना पाणी देण्यासाठी पुरुषोत्तम बापूराव ढूमणे यांनी शेताजवळील नाल्यावर विद्युत मोटार बसवली होती आणि त्याद्वारे ते आपल्या रब्बीच्या पिकांना पाणी देत होते परंतु सोमवार (दि ०७) ला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चक्क विद्युत मोटर लंपास केली.
याच शिवारातील ही दुसरी घटना आहे पंचेचाळीस दिवस अगोदर शामराव मालेकर यांच्या शेतातील देखील विद्युत मोटार चोरट्यांनी लंपास केली होती. या शिवारात चोरट्यांनी विद्युत मोटर लंपास करण्याकडे आपला मोर्चा वळवीला आहे. तरी पुरुषोत्तम बापूराव ढूमणे यांनी या घटनेची तक्रार मारेगाव पोलीस केली असून पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.