Type Here to Get Search Results !

अपक्ष बाबुराव नगराध्यक्ष पदाला....अन जीव लागला टांगणीला..!

 पडघम नगराध्यक्षाचे ...

अपक्ष बाबुराव नगराध्यक्ष पदाला....अन जीव लागला टांगणीला..! 

🔸मारेगाव अध्यक्षपदाचा निकाल लागणार आश्चर्यकारक ?
🔸राष्ट्रीय पक्ष,अपक्षाच्या मागोमाग अन नगरसेवकांची भागमभाग


मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक पाच उमेदवार निवडून आल्यानंतर किमान काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होईल असे भाकीत सर्वत्र वर्तविण्यात होते. मात्र ऐनवेळी कांग्रेसचाच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारास चक्क कांग्रेसने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केल्याने सर्वांनाच जोर का झटका धिरे से लागला.या राजकीय गेमचेंजरच्या डावामुळे अधिकृत पक्षाच्या नगरसेवकात कमालीचे असंतोष खदखदत आहे.

त्यामुळे कदाचित अध्यक्षपदाचा निकाल आश्चर्यकारक लागणार नाही ना ? अशी शक्यता निर्माण होण्याचे संकेत आहे.त्यामुळे नगराध्यक्ष पदाला..जीव लागला टांगणीला म्हणण्याची वेळ आली आहे.

मारेगाव नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे.१७ नगरसेवकात काँग्रेसचे पाच , शिवसेना चार , भाजप चार , महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन , राष्ट्रवादी पार्टी एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे.मारेगावचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस , मनसे , राष्ट्रवादी व अपक्ष युतीचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नंदेश्वर आसुटकर यांनी नामांकन दाखल केले.तर शिवसेना कडून डॉ. मनीष मस्की व भाजप कडून हर्षा अनुप महाकुलकार यांनी अर्ज दाखल केले आहे.उद्या 14 फेब्रुवारी ला एन वेलेन्टाइन च्या दिवशी कोणाचा लाडका नगराध्यक्ष होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या चुरशीत आपला नगरसेवक कुठे गायब झाला याचा मारेगावकरांना प्रश्न पडला असतांना काही नगरसेवक हैद्राबाद येथे गेल्या पाच दिवसापासून चिकन बिर्याणी चा आस्वाद घेत आहे.तर काही नगरसेवक निवडणुकीचा थकवा घालविण्यासाठी गोवा येथील समुद्र किनाऱ्यावर सूर्यनमस्कार करीत असल्याची माहिती आहे.

अपक्ष उमेदवार दिल्याने कांग्रेस युतीतील काही नगरसेवक मतदान करणारच नाही हा हट्ट घेऊन कोपभवनात जाऊन बसल्याची चर्चा आहे.वरिष्ठांनी नाराजांची मनधरणी सुरू केली आहे.मात्र उद्या सकाळी 11 वाजता सत्तेच्या सारीपटावर कोण खरा 'सम्राट' बनेल याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

काँग्रेसच्या गटात प नाराजीचे मोठ्ठे झटके जाणवत असल्याने शिवसेनेचे डॉ.मस्की हे जनतेची तब्बेत सुधारण्यासाठी नगराध्यक्ष पदावर आसन होतील असा कयासही लावला जात आहे.तर भाजपच्या उमेदवार हर्षा महाकुलकार मुळे भाजप गोटात हर्ष निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे तीनही नगराध्यक्ष पदाचे दावेदार अगदी युवा असल्यामुळे यावेळेसची नगराध्यक्षा ची माळ तरुणाईच्या गळ्यात पडणार असून पहिल्यांदाच मारेगावकरांना युवा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ अनुभवायला मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies