Type Here to Get Search Results !

दिग्रस येथे शांतता समितीची बैठक संपन्न

दिग्रस येते शांतता समितीची बैठक संपन्न

यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षकांची  उपस्थिती




दिग्रस:- प्रतिनिधी
येणाऱ्या काळातील उत्सवात जातीत व धार्मिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या मुख्य उद्देशाने, बुधवार, १६ फेब्रुवारीला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मुख्य मार्गदर्शनात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. येणाऱ्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव व येथील ख्वाजा बाबा उर्फ उखलीवाले बाबा यांचा उर्स शरीफ या निमीत्ताने निघणारे संदल व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होत असलेल्या स्मारकाच्या सौंदर्यीकरणाला घेऊन शांतता समितीची बैठक येथील पोलीस ठाण्याच्या प्रांगणात घेण्यात आली होती.उत्सवा निमित्त निघणारी रॅली, मिरवणूक व अभिवादन सभेसाठी शासनाने दिलेले निर्देश यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी स्पष्ट बोलून दाखविले, असून प्रत्येक उत्सव हे कायद्याच्या चाकोरीत साजरे करा, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले ,यावेळी पुसद उपविभागीय अधिकारी सावन कुमार, तहसीलदार सुधाकर राठोड, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता राठोड, नगर परिषदेचे नगर अभियंता किशोर दरेकर, उपअभियंता सुमिनाथ सदगर हे उपस्थित होते.

या बैठकीचे प्रास्ताविक पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग फाडे यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार डाॅ.प्रदीप मेहता यांनी केले यावेळी, पत्रकार अभय इंगळे, जावेद पटेल, काँग्रेसचे जेष्ठ नेते राजेंद्र चौहाण, नगरसेवक नुरमहंद खान, माजी शिवसेना प्रमुख पुनम पटेल, नगरसेवक सै.अक्रम व प्रणित मोरे, नगरसेवक बाळू जाधव यांनी उत्सवा दरम्यान अडथळे, उत्सवा दरम्यान शासनाची मदत मिळावी या संदर्भात आप आपले विचार व्यक्त केले.यावेळी शांतता समितीचे सदस्य, पत्रकार, शिव जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शासनाने ज्या गाईड लाईन्स दिल्या त्याचे अनुकरण करा

नुकत्याच शासनाने शिव जयंती उत्सवा निमित्त नविन गाईड लाईन्स दिल्या आहेत, त्यात असे नमुद केले आहे की, कोणत्याही शोभायात्रा, कोणत्याही मिरवणूका काढण्यात येऊ नये, म्हणून आयोजन समितीला विनंती आहे की, पोलीस ठाण्याकडून शासनाच्या आदेशानुसार नोटीस दिल्या जातील त्याचे अनुपालन करतांना त्यात कश्या पध्दतीने कार्यक्रम बसवता येतील असे नियोजन करा, जो कार्यक्रम राहणार आहे, तो केबल नेटवर्क द्वारे, शोसल मिडीया द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा, कारण आपल्याला पाचशेच्या वर जमाव करता येणार नाही परंतू या पाचशेवर किती शून्य लावा तेवढ्या नागरीकां पर्यंत आपण ऑनलाईन द्वारे ,समाज माध्यमांद्वारे , केबल नेटवर्क द्वारे जाऊ शकतो असे निर्देश शासनाने दिले आहेत.याचे अनुपालन करावे असे आवाहन जिल्हापोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांनी उपस्थितांना करित, जिल्ह्यात घडलेल्या काही घटणांचे उदाहरण देत, त्यातील चुका निदर्शनास आणून देत, आपण अलर्ट रहा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा असे सुध्दा त्यांनी यावेळी पुढे बोलतांना सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies