गुरुकुल मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा...
दिग्रस :- प्रतिनिधी
१९ फेब्रुवारी ला अखंड हिंदुस्थानचे दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक शेख शरीफ हे होते. सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले.त्यांनतर शाळेतील मुलांनी नृत्य, भाषणे सादर करत, नाट्याच्या माध्यमातून अफजल खान चा वध दाखविला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपुर्ण आयुष्य प्रजेच्या रक्षणासाठी व हितासाठी खर्ची घालत स्वराज्याची निर्मिती केली. महाराज हे फक्त एक राजे नसून ते एक विचार आहेत. आणि त्यांचा अभ्यास करून त्यांचे विचार अंगिकारने ही आजच्या काळाची गरज आहे असे विचार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
वर्ग 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी नाटकच्या द्वारे शिवरायांच्या आयुष्यातील अंगावर शहारे प्रसंग सादर केला.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी छ.शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केली, त्यातून बालशिवाजी महाराज यांचे साक्षात दर्शन सर्वाना झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 8 च्या कु. अपूर्वा अशोक वहिलेकर व कु. श्रुती मधुसूदन लहाने यांनी केले तर आभार शाळेच्या पर्यवेक्षिका एन शिरीषा यांची मानले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शेख आबेदा बेगम, उपमुख्याध्यापक शेख शरीफ, अनिकेत कोळसे, सीमा मिश्रा, एन शिरीषा यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.