दिग्रस येथे १९ व २० फेब्रुवारीला कबड्डीचे खुले सामने , ८० हजारांचे बक्षीस
दिग्रस :- प्रतिनिधी
कबड्डीची पंढरी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या दिग्रस येथे महान संत श्री सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीनिता इन्फ्रातर्फे १९ व २० फेब्रुवारीला भव्य खुले कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले आहे . यात ८० हजार रुपयांचे चार सांघिक व आठ व्यक्तिक बक्षीस देण्यात येणार असून प्रवेश शुल्क हजार रुपये ठेवण्यात आले आहे .सदर सामन्यात एक गाव एक संघ या प्रमाणे संघांना प्रवेश देण्यात येणार आहे . प्रथम बक्षीस ३१०००/- रुपये , द्वितीय २१०००/- , तृतीय ११०००/- , तर चतुर्थ बक्षीस ७०००/- ठेवण्यात आले आहे . स्पर्धेतील उत्कृष्ट रेडर व उत्कृष्ट कॅचरला प्रत्येकी अडीच हजार , क्वार्टर फायनल पराभूत संघाच्या बेस्ट रेडर व बेस्ट कॅचरला प्रत्येकी ५०० रुपये , सेमीफायनलच्या बेस्ट रेडर व बेस्ट कॅचरला प्रत्येकी हजार रुपये , तर अंतिम सामन्यातील बेस्ट रेडर व बेस्ट कॅचरला प्रत्येकी हजार रुपये , असे एकूण ८० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे .
दिग्रस येथील क्रीडा संकुलावर हे सामने होणार असून उद्घाटक म्हणून माजी क्रीडा मंत्री संजय देशमुख उपस्थित राहतील . शिव छत्रपती पुरस्कार विजेते रामूजी पवार , माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग , पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे , आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार , देविदास सरबेरे , खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संजय दुद्दलवर , तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर जाधव , नगरसेवक रुस्तम पप्पूवाले , भाजप भटके-विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राठोड , ऍड विवेक बनगीनवार , विविध कार्यकारी संस्थेचे माजी अध्यक्ष सलीम दादूवाले , अनुराग पाटील , बाळासाहेब खांदवे , संतोष झाडे , सुरेश शर्मा , अब्दुल हन्नान शेख , प्रदीप नगराळे व वसंत खाडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील .
माजी वन मंत्री व आमदार संजय राठोड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल . तहसीलदार सुधाकर राठोड , माजी नगराध्यक्ष शाम पाटील , नूर मुहम्मद खान , डॉ संजय बंग , कबड्डी व खोखोचे मार्गदर्शक किशोर बोंडे , राष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण पवार , ठाणेदार देवराव राठोड , मा ठाणेदार एन डी जाधव , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनील राठोड , जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख , गायत्री फाउंडेशनचे डॉ उत्तम राठोड , अभियंता गणेश चव्हाण , जिल्हा परिषद सदस्य लखन राठोड , नगरसेवक किशोर साबू , शासकीय कंत्राटदार राहुल शिंदे , माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूसिंग जाधव आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे .
राष्ट्रीय कबड्डीपटू श्रीचंद राठोड , अविनाश चव्हाण , बंटी राठोड , सोनू राठोड आयोजक आहे . स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहे . विस्तृत माहिती , नियम व अटी जाणून घेण्यासाठी किंवा सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी राष्ट्रीय खेळाडू अविनाश चव्हाण , मोबाईल क्रमांक ९४०४८२८३०४ किंवा बंटी राठोड , मोबाईल क्रमांक ८४४६४१९८१९ यांच्याशी संपर्क साधावा .