Type Here to Get Search Results !

राष्ट्रसंताना भारतरत्न द्यावा उदय पाल वणीकर यांची मागणी

 राष्ट्रसंताना भारतरत्न द्यावा उदय पाल वणीकर यांची मागणी

वणी:- प्रतीनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रंथसंपदा आणि कार्य विश्वविख्यात आहे .ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी आदर्श भारताची रचनात्मक मांडणी केली अनेक स्फूर्तिदायक क्रांतिगीते लिहून स्वातंत्र्ययोद्ध्यांना आणि युवकांना प्रेरीत केले . त्यांच्या कार्याची दखल अनेक तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांनी घेतली . स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ . राजेन्द्रप्रसाद , पूर्व प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू , इंदिरा गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी गुरुकुंज आश्रमात जाऊन राष्ट्रसंतांची प्रत्यक्ष भेट घेतली . एवढेच नव्हे तर सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत अनेक दिवसांपर्यंत राष्ट्रहिताच्या चर्चा आणि नियोजन झाले . १ ९ ४२ च्या क्रांतीसह अनेक लहान - मोठ्या ब्रिटीशविरुद्ध लढयात राष्ट्रसंतांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग राहिला . त्यांना यासाठी कारावासही झाला .

राष्ट्रसंतांच्या कार्याची दखल संपूर्ण विश्व घेत आहे .अनेक विद्यापीठांतून यांच्या रचनांचा , साहित्याचा विद्यार्थी अभ्यास करत आहे . राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरांवर गाजलेल्या या महामानवाला स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटून भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही . ही अत्यंत खेदाची बाब आहे .

तेव्हा आपल्या माध्यमातून भारत सरकारला आम्ही विनंती करतो की , त्यांनी राष्ट्रसंतांना सन्मानपूर्वक भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा . राष्ट्रसंतांच्या साहित्याने राष्ट्रीय क्रांती केली . तशीच वैचारिक आणि सामाजिक क्रांतीही केली आहे . त्यांच्यासोबत प्रत्यक्ष राहून अनेकांनी त्यांचे विचार स्वीकारले . त्यांच्या विचारांवर कार्य केले . राष्ट्रसंतांच्या निर्वाणानंतर तेच कार्य त्यांच्या साहित्य करीत आहे . राष्ट्रसंतांच्या विचारातून अनेक पिढ्यातील कीर्तनकार , प्रबोधनकार आजही हे काम करीत आहे . हाच विचारांचा वारसा घेऊन अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुळचे सिरसोली गावाचे सत्यपाल चिंचोळकर हे ५० वर्षांपूर्वी राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रभावित आणि प्रेरीत झाले . ग्रामप्रबोधनाचा आणि लोकजागराचा धागा पकडून ते आजही राष्ट्रसंतांचे विचार गावोगावी घरोघरी पोहचवीत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन , शिक्षण , आरोग्य , व्यसनमुक्ती या विषयांवर ते जनजागृती करीत आहेत . त्यांच्या प्रबोधनामुळे अनेक युवक व्यसनमुक्त होऊन सन्मार्गाला लागलेत .

राष्ट्रसंतांचे कार्य आणि विचार ते घरोघरी पोहचविण्यासाठी आजही धडपड करीत आहेत . त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा प्रेरणेने अनेक तरुण , तरुणी प्रबोधनाच्या क्षेत्रात उतरले . ते अनेक छोट्या - मोठ्या पुरस्काराने सन्मानीत झालेत . त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो . तसेच प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात यावे अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो . शेवटी माझ्यासह अनेक गुरूदेव भक्तांची ही मागणी आहे की , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न तर प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात यावां.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies