मारेगाव आय.टी. आय. मध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर
मारेगाव :- संतोष बहादुरे
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये प्रशिक्षणार्थी करिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.यात विविध कायद्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव येथील न्यायाधीश निलेश वासाडे होते.प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्राचार्य सुजय राहाटे,इंजिनिअर सौ.श्यामली निलेश वासाडे,कृषी विस्तार अधिकारी संदीप वाघमारे, एड मेहमूद पठाण,एड.भाग्यश्री बदखल.तंत्र निदेशक जीवन केराम सर,जीवन गड्डमवार सर मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी एड.मेहमूद पठाण यांनी माहिती अधिकार कायदा,इंजिनिअर सौ.श्यामली निलेश वासाडे यांनी आय. टी. आय.नंतर करिअरच्या संधी,एड.भाग्यश्री बदखल हिने महिला शक्ती कायदा यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड.काजल शेख हिने तर आभार प्रदर्शन तंत्रनिदेशक पूजा मडावी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉ चे विद्यार्थी मेघा कोडपे,मृणाली गाणार, न्यायालयीन कर्मचारी सुरज टेंबरे,पी.एन.बुजाडे, पवन राऊत,मोसीम शेख यांचेसह आय.टी. आय.चे सर्व तंत्रनिदेशक,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले