किसन मत्ते यांची वृद्ध साहित्यिक , कलावंत मानधन समितीवर निवड
जिल्हातील सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या वृद्ध साहित्यिक तथा कलावंतांना मानधन निवडीच्या समितीमध्ये सदस्य म्हणून मारेगाव तालुक्यातील गोरज येथील किसन मत्ते यांची निवड करण्यात आली. आजतालुक्यात मोठ्या प्रमाणात वृद्ध साहित्यिक व समाज प्रबोधन करणारे कलावंत असून शासनाच्या विविध योजना तर प्रामुख्याने मानधना पासून कोसो दूर आहे.प्रशासकीय स्तरावर अनेकदा वृद्ध कलावंत उंबरठे झिजवित न्यायिक अपेक्षा करतोय.मात्र स्थानिक तालुका पातळीवर यांचेकडे लक्ष केंद्रित करणारे प्रतिनिधित्व नसल्याने हे कलावंत मानधनापासून वंचित आहे.
किसन दादाजी मत्ते यांच्या निवडीने कलावंत , साहित्यिक यांचे प्रलंबित प्रश्न सुकर होवुन मार्गी लागतील अशा अपेक्षा व्यक्त होत आहे.जिल्हास्तरीय सन्मानार्थी वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती मध्ये अशासकीय सदस्य म्हणून पालकमंत्री संदीपान भुम्बरे यांनी मारेगाव तालुक्यातील गोरज येथील किसन मत्ते यांची निवड केली आहे.
मत्ते हे आपल्या निवडीचे श्रेय माजी आमदार विश्वास नांदेकर आणि तालुका प्रमुख संजय आवारी यांना देतात.या निवडीचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.