Type Here to Get Search Results !

रकमेसह सोन्याच्या दागीण्यावर हात साफ

धक्कादायक....

रोख रकमेसह सोन्याच्या दागीण्यावर हात साफ

🔸आंबेझरी येथील घटना
🔸६० हजार रोख व एक लाखाच्या आभूषणाचा समावेश
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंबेझरी येथील एका शेतकऱ्याच्या घरातून एक लाखाचे सोन्याचे दागीने व साठ हजार रुपये लंपास केल्याची घटना आज शुक्रवारला उघडकीस आल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
मारेगाव पोलीस स्टेशन व झरी तालुक्यातील सीमेवर असलेल्या आंबेझरी येथील शामराव ढोबरे हे बुधवारला शेतात गेले होते. सायंकाळी घरी येताच त्यांना कुलूपबंद दरवाजाची साखळीकोंडा उकलून दिसला.मात्र त्या व दुसऱ्या दिवसाला त्यांनी मनावर घेतले नाही.परिणामी आज शुक्रवारला सकाळी पैशाचे काम पडल्याने ते डब्बा काढण्यास गेले असता त्यातील ६० हजार रुपये व चांदी सह सोन्याचे किमान एक लाखाचे दागिने असा एकूण एक लाख साठ हजार रुपयांचा ऐवज लंपास झालेले दिसले.त्यामुळे सदर पिडीत शेतकरी दाम्पत्याच्या पायाखालची वाळू सरकली.

दरम्यान , घरात इतरत्र शोधाशोध केली असता अज्ञात इसमाने हात साफ केल्याचे निदर्शनात आल्यानंतर थेट मारेगाव पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies