बायकोच्या ओढणीने नवऱ्याने घेतला गळफास
🔸 सिंधी महागाव येथील घटना🔸आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
कुंभा :प्रतिनिधी
परिसरातील सिंधी महागाव येथील तीस वर्षे युवकाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान घडली.या घटनेने गावात पुरती शोककळा पसरली आहे.
वैभव मारुती वैद्य (३०) रा. सिंधी असे मृतक युवकाचे नाव आहे. मृतक शेतात आई-वडिलांसह काम करीत होता. सायंकाळच्या दरम्यान मृतक शेतातून घरी आला .पत्नी गर्भवती असल्यामुळे मागील काही दिवसांपासून माहेरी जाऊन होती. घरी कोणीच नसल्याच्या संधीचा फायदा घेत त्याने पत्नीच्या ओढणीने गळफास घेत जीवनयात्रा संपविली .आई-वडील शेतातून घरी येतात सदर घटना उघडकीस आली. या घटनेबाबत तात्काळ पोलीस पाटील संतोष निब्रड यांनी मारेगाव पोलिसांना कळविले . पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले .वृत्त लिहीपर्यंत कारवाई सुरू होती.