अवैध रेती ट्रॅक्टर चौकशीसाठी ताब्यात
🔸वनविभागाची कसून चौकशी🔸वेगाव शिवारातील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वेगाव परिसरातील वनविभागाच्या अखत्यारीत अवैद्य रेती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला वनविभागाने ताब्यात घेतले असून चालक व मालक यांची कसून चौकशी सुरू आहे.
मारेगाव तालुक्यात अवैध वाळू माफिया कडून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावण्याचे षडयंत्र नवीन नसतांना आज मारेगाव तालुक्यातील वेगाव जंगल परिसरात वनविभागाचे कर्मचारी कर्तव्यावर होते.
दुपारी बारा वाजताचे सुमारास डोंगरगाव येथील अमोल रामदास राजूरकर चालक व पवन बापुजी जांभूळकर रा.वेगाव यांच्या मालकीचा ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू घेऊन जंगलपरिसरातून जात असतांना वनकर्मचार्यांनी ताब्यात घेतला.नेमकी वाळू कुठून आणली , रॉयल्टी आहे काय याबाबतची कसून चौकशी सुरू आहे. सदर अवैध वाळू भरलेला ट्रॅक्टर वृत्त लिही पर्यंत जप्त करण्यात आला नव्हता.