डोल डोंगरगाव येथील शाळेला आग
मार्डी :- प्रतिनिधी
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या डोल डोंगरगाव येथील येथील शाळेच्या डिजिटल वर्ग खोलीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत दीड लाखाचे शैक्षणिक साहित्य जळाल्याची घटना 26 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडली.तालुक्यातील डोल डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल वर्ग खोलीला 26 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता दरम्यान अचानक आग लागली. या आगीत संगणक टीव्ही व इतर शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले. आगीत जवळपास दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गावांमध्ये विवाह सोहळा असल्यामुळे पाहुणेमंडळी जागीच होती. यादरम्यान त्यांना शाळेतून आगीच्या ज्वाळा दिसताच ,त्यांनी शाळेकडे धाव घेतली .मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. सदर आज शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.