Type Here to Get Search Results !

दिग्रस तहसीलदारांनी कोब्रा कमांडो गौतम धवने यांच्या निवेदनाची दखल घेत लावले सैनिकांसाठी तात्काळ प्राधान्य फलक

दिग्रस तहसीलदारांनी कोब्रा कमांडो गौतम धवने यांच्या निवेदनाची दखल घेत लावले सैनिकांसाठी तात्काळ प्राधान्य फलक

प्रतिनिधि :- दिग्रस
दिग्रस तहसील कार्यालयामध्ये भारतीय सैन्य दलात राहून देशसेवा करणाऱ्या तसेच निवृत्त झालेल्या जवान व त्यांच्या कुटुंबीयांचे तहसील पातळीवरील काही शासकीय कामे विनाविलंब, त्यांची हेळसांड न होता कामे प्राधान्याने व्हावी यासाठी दिग्रस तहसीलदार यांना झारखंड येथे नक्षल भागात राहून देश सेवा करणाऱ्या व लायगव्हाण तालुका दिग्रस येथे राहणाऱ्या कोब्रा कमांडो गौतम धवने यांनी दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आले होते त्याची तहसीलदार दिग्रस यांनी तात्काळ दखल घेत दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी दिग्रस तहसील कार्यालयामध्ये भारतीय सैन्य दलातील आजी व माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे कामे प्राधान्याने करण्याबाबतचे फलक लावण्यात आले त्यामुळे गौतम धवने यांच्या रास्त मागणीला न्याय देत देशसेवा करणाऱ्या सैनिकांची कामे करणे हे आमचे नैतिक कर्तव्य असून त्यांची कामे प्राधान्याने करण्यात येईल त्यासाठी त्यांनी थेट संपर्क करण्याचे आवाहन देखील तहसीलदारांनी यावेळी केले .कोब्रा कमांडो गौतम धवने यांनी यापूर्वीही सेतू कार्यालयामध्ये आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रांसाठी शासकीय दर फलक लावण्याची मागणी केली होती. कारण सेतू कार्यालयामध्ये खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेची लूट करण्यात येऊन पिळवणूक होत होती ती थांबविण्याची विनंती जिल्हाधिकारी यवतमाळ यांना केली होती तीही मागणी तहसीलदार सुधाकर राठोड यांनी मान्य करुन सेतू कार्यालयाजवळ आवश्यक कागदपत्रासाठी लागणारे शासकीय दर फलक लावण्यात आले. त्यांच्या या कामगिरीबद्दल ज्याप्रमाणे ते देशासाठी सेवा करतात त्याचप्रमाणे ते गावी आल्यानंतरही जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहून सेवा देतात व त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे व त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी उपस्थित माजी सैनिकांच्या कुटुंबातील तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल भरारे, पोलीस पाटील ओम खोडे, ज्येष्ठ पत्रकार अरुण इंगोले, दिग्रस तालुका संघटनेचे कार्याध्यक्ष पत्रकार किशोर कांबळे, दिग्रस लाईव्ह चॅनल चे संचालक अमिन कलरवाले, आकाश काशीकर, नंदू गरिबे सह असंख्य नागरिक उपस्थित होते.

देश सेवा करणाऱ्या सैनिकांची व जवानांची सेवा करणे ही माझी नैतिक जबाबदारी असून त्यांची कामे तात्काळ करण्यात येईल ,
तहसीलदार- सुधाकर राठोड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies