वर्षा बोथले यांची तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला उपाध्यक्ष पदी वर्णी
मारेगाव :- प्रतिनिधीमारेगाव तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्ष पदी वर्षा विजय बोथले यांची निवड करण्यात आली.सदर नियुक्ती पत्र महीला तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुप्रिया जोगी यांनी दिले.
तालुक्यात काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण यासह पक्ष मजबूत करण्याकडे कल असणार असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी निवडीनंतर दिल्या. या निवडीचे श्रेय माजी आमदार वामनराव कासावार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण खंडाळकर ,तालुका अध्यक्ष मारोती गौरकार ,विजय घोटेकर, गजानन खापणे ,मारोती मत्ते, राजू महाजन सह आदींना देते.
