आत्महत्येची धग...
विवाहित इसमाने घेतले जंगलात विष
🔸पारधीबेडा ( वरुड ) येथील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वरुड पारधीबेडा येथील विवाहित इसम शेळ्या चारण्यासाठी जाऊन जंगलात विष घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज शुक्रवारला घडली.
तालुक्यातील वरुड पारधीबेडा येथील विवाहित इसम शेळ्या चारण्यासाठी जाऊन जंगलात विष घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज शुक्रवारला घडली.
विजय सब्बल पवार (४२) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून आज तो शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले असता तिथेच त्याने विष घेतले.अन्य गुरख्यांना ही बाब लक्षात येताच गावात आणले.तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.मात्र वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.
दरम्यान , आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.मृतक विजय च्या मागे आई, पत्नी व दोन मुले आहेत.