अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच गतप्राण
मारेगाव पासून एक किमी अंतरावर दिनांक ३१/०१/२०२२ ला अंदाजे ७.३० वाजता दुचाकीस्वाराला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघात मध्ये दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला.
विकास बबनराव डाहुले रा.म्हैसदोडका वय ३५ असे मृतकाचे नाव असून. मृतक विकास हे काल मारेगाव वरून आपले काम आटपून स्वतःचा दुचाकीने गावाकडे जात असताना त्यांचा मारेगाव पासून एक किलोमीटर अंतरावर असलेले दारुंडे यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेमध्ये विकास खाली पडला आणि त्या वाहनाचे चाक मृतक विकास यांच्या डोक्यावरून गेले त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.विकास यांचा मागे आई,वडील,पत्नी व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.