छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
दिग्रस:- प्रतिनिधी
येथील तहसील चौकात दिनांक 19 फेब्रुवारी रोजी 2022 महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी दिग्रस चे तहसीलदार मा. सुधाकर राठोड होते तर प्रमुख पाहुणे सुधीर भाऊ देशमुख, वरिष्ठ पत्रकार गौतम तुपसुंदरे , ठाणेदार पांडुरंग फाडे , राजपूत कृषी अधिकारी, विधी तज्ञ अॕड.विजय शिंदे दिनेश सुकोडे, प्रणित मोरे हे होते.
आपले विचार मांडताना वरिष्ठ पत्रकार गौतम तुपसुंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी प्रथमता महात्मा फुले यांनी शोधून काढली आणि सर्वात पहिले शिवजयंतीचा उत्सव महात्मा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये साजरा केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा देखील महात्मा फुले यांनी लिहिला आहे. मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडून मोडून लिहिण्यात आला होता. शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी दाखविण्यात आले होते, परंतु मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम खेडकर ज्येष्ठ साहित्यिक मा. म. देशमुख व आ. ह. साळुंखे यांनी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मांडला. त्यामुळेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अठरापगड जातींमध्ये उत्साहात साजरी करतो.
या प्रसंगी मा. सुधीर भाऊ देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करताना शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नसून सर्व जाती धर्माचा आदर करणारे राजे होते असे, स्पष्ट केले. या प्रसंगी राजा चव्हाण,दिनेश सुकोडे, आपले विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे संचालन संदेश तुपसुंदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बरडे काका, ज्ञानेश्वर शिखरे, बाळूभाऊ ढाले, संजीव पोटे, भारत जाधव, निलेश जाधव, वैभव दुर्गे, हितेश ठाकरे, मनिष आंबेकर, सचिन जोगदंडे यांनी अथक परिश्रम घेतले.