वेगाव शिवारात वाघाचा मुक्तसंचार,पशुधनाचा पाडला पडशा
🔸️ शेतकरी शेतमजूरात दहशतीचे वातावरण
🔸️ वनविभागाने बंदोबस्त करावा : ग्रामस्थांची मागणी
वेगाव :- राज पिपराडेवेगाव शिवारामध्ये वाघाचे मुक्त संचार असून दिनांक २८/०१ /२०२२ ला वाघाने वेगाव शिवारामधील एका गोऱ्याला ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.परिणामी वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांची हानी टाळावी अशी आर्जव मागणी होत आहे.
वेगाव येथील शेतकरी सुधाकर बापूजी टोंगे (57)यांचे शेत केगाव रोडला आहे. यांच्या शेतामधील गोठ्यामध्ये बैल गाय आणि गोरे अशी जनावरे बांधून असता रात्रीला वाघाने त्यामधील एका पशुधनाचा फडशा पाडल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे.
परिसरात वाघाचे या अगोदर देखील दर्शन झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतमजूर व शेतकऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे.