वेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांचे माहेरघर
🔸 जय जगन्नाथ क्रीडा मंडळाचे वरिष्ठाकडे निवेदन
वार्ताहर :- राज पिपराडे
मारेगाव तालुक्यातील वेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मधील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी व जगन्नाथ क्रीडा मंडळाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याचे पाणी व आरोग्य केंद्राच्या परिसरातील साफसफाई नसल्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर मोठा प्रमाणात परिणाम होत असून या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या मार्गाचे तीन तेरा वाजले आहे. मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडे व मार्गाच्या कडेला असलेल्या ग्रामस्थांचे अतिक्रमण या समस्यांचे त्वरित निरसन करण्या करिता ग्रामस्थ व जय जगन्नाथ क्रीडा मंडळाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तेजस थेरे,संतोष ठक, सचिन ढोके, प्रफुल ठावरी,गजानन सूर, प्रजोत कापसे,प्रफुल सूर,प्रशांत मोहितकर,दामू ढोके,गणेश कापसे ,मनीष माथनकर,सुरज ढोके,चेतन कापसे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.