Type Here to Get Search Results !

मारेगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या वाटेवर

राजकीय पलटवार...

मारेगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या वाटेवर

🔸अंकुश माफुर  यांच्या नेतृत्वात होणार प्रवेश
🔸
काँग्रेस गतवैभवाच्या उंबरठ्यावर
🔸वणी येथे सोमवारला धरणार "हात"

मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव तालुक्यातील राजकीय पक्षाला भगदाड पडत आहे.काही राजकीय पक्षाचे शेकडो कार्यकर्ते येत्या सोमवारी हात पकडत काँग्रेसला गतवैभव आणण्याचा आटापिटा करणार आहे.मारेगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अंकुश माफुर यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश वणी येथे होणार आहेत.

वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय देरकर यांच्या नेतृत्वात पक्षाची मोट बांधली मात्र पक्षाच्या राज्यपातळीवरील राजकीय नेत्यांनी या क्षेत्राकडे कानाडोळा केल्याने देरकर यांनी अनेक पक्षाचे चिंतन करीत शिवबंधन बांधले.त्यानंतर डॉ.महेंद्र लोढा यांनी हाताला घड्याळ बांधीत झंझावात सुरू केला.पक्षाने विधानसभा तिकीट नाकारल्याने तेही "वंचित"झाले.आणि तेव्हापासून राष्ट्रवादीला घरघर सुरू झाली.डॉ. लोढा हे आता काँग्रेसवासी होत असतांना येत्या सोमवारला अधिकृत प्रवेश घेणार आहे.कार्यकर्त्यांची राजकारणातील रंगीत तालीम म्हणून मारेगाव तालुक्यातील बहुतांश कार्यकर्ते राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस अंकुश माफुर यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश करणार आहे.मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षात वेगवेगळ्या पक्षांच्यां कार्यकर्त्यांच्या रीघ लागल्याने मेटाकुटीस आलेल्या काँग्रेसला गतवैभव प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies