🚩शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐
बाळासाहेब ठाकरे हे एक धुरंदर राजकारणी, उत्तम व्यंगचित्रकार व संपादक होते. शिवसेना या पक्षाचे ते संस्थापक होते आणि सामना या दैनिकाचे संस्थापक व प्रमुख संपादक होते.
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रमाबाई ठाकरे असे होते. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे एक मराठी पत्रकार व समाज सुधारक होते.
कारकिर्दीच्या सुरवातीला बाळासाहेबांनी 'फ्री प्रेस जर्नल' मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले. पुढे १९६० साली त्यांनी महाराष्ट्राच्या उद्धारासाठी 'मार्मिक' हे स्वतःचे साप्ताहिक सुरु केले.
१९ जून १९६६ रोजी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही त्यांच्या पक्षाची घोषणा होती. महाराष्ट्रात अनेक उद्योग असूनही मराठी माणूस बेरोजगार व गरीब आहे हे त्यांनी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिले. त्या दिशेने त्यांनी काम केले व मराठी माणसांना रोजगार उपलब्ध करून दिले. असंख्य गरजवंतांना त्यांनी मदत केली.
त्यांचे वक्तृत्व आक्रमक आणि प्रभावी होते. मनात येईल ते स्पष्ट बोलून ते मोकळे व्हायचे. त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी जमत असत. बाळासाहेब आणि गर्दी हे एक समीकरण बनले होते. त्यांच्या रोखठोक भाषाशैलीमुळे ते विरोधकांना पळता भूई करत.
🏹23 जानेवारी🏹
🚩हिंदुहृदयसम्राट सरसेनापती वंदनीय
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐
अभिवादनकर्ते
नरेंद्र पा. ताजणे
जिल्हा संघटक - शिवसेना सोशल मीडिया ,यवतमाळ
मातोश्री सिमेंट ब्रिक्स,वणी
सत्ता हाती नसतांनाही , दिल्ली पर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणार , वत्कृत्वचा धबधबा होता, डोळ्यांमधून कोसळण्याची आसवांची आज मुभा आहे, कारण साहेब तुमच्या मुळेच मराठी माणूस अभिमानाने उभा आहे , हिंदहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे.
मनामनात उसळली जेव्हा मराठी अस्मितेची लाट..महाराष्ट्रात जन्मले तेव्हा माननीय हिंदुहृदयसम्राट ..मराठीसाठी काढिले त्यांनी सामना है वृत्तपत्र.. मार्मिकपणे बोललं त्याच प्रत्येक व्यंगचित्र..ना द्वेष कैला कोणत्या धर्मावर वा जातीवर.. प्रेम केले सदैव त्यांनी आपुल्या मराठमोळ्या मातीवर..!