नगराध्यक्षाचे पडघम...
महिलेच्या गळ्यात पडणार नगराध्यक्ष पदाची माळ?
🔸अंतर्गत कलहाला उत
🔸मारेगावला पोखरणाऱ्यांना बाजूला सारा : सर्वसामान्यांची मागणी
मारेगाव शहराच्या विकासाची स्थानिक स्वराज्य संस्थेची अर्थात नगरपंचायतच्या निवडणुकीत कुणालाही स्पष्ठ बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांना कुबड्याचा आधार घ्यावा लागणार आहे.नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गाचे निघाल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.मात्र एका राजकीय पक्षात व विकासाच्या नावावर शहराला पोखरणाऱ्या 'नावाला' च प्रचंड विरोध होत असल्याने अंतर्गत कलह वाढत आहे. त्यामुळे " एका" महिलेच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडण्याची संभाव्य शक्यता आहे.
मारेगाव नगरपंचायतचा निवडणूक निकाल जाहीर झाला.काँग्रेस पाच , सेना - भाजप प्रत्येकी चार , मनसे दोन , राष्ट्रवादी एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल असून नगराध्यक्ष पदासाठी आता दावे प्रतिदावे होत आहे.काँग्रेस पक्षाला सर्वाधिक पाच जागा मिळाल्याने हा पक्ष सत्तेसाठी कूच करीत आहे.या पक्षात सर्वच जणांनी नगराध्यक्षच्या पदासाठी बाशिंग बांधले आहे.मात्र सहकारी म्हणून शिवसेना नेमकी कुणाला पसंती देते? यावर सत्तेचा सारीपाट अवलंबून आहे.शिवसेना कडून काही नावाला विरोध झाला तर वेगळा पर्यायाची चाचपनीही सुरू झाली आहे. अभी नही तो कभी नही म्हणत एका नगरसेवकाने गनागोतांकरवी खासदार बाळू धानोरकर यांचेकडे लोटांगण घालत आहे.मात्र अंतर्गत धुसफूस व गावातील नागरिकांत या नावाला प्रचंड विरोध असल्याने आता नेत्यांनीही हा रोष पदरी पाडून घेऊ नये अन्यथा आगामी निवडणुकीत याचा विपरीत परिणाम दिसू शकतो. याचा गांभीर्याने विचार अन चिंतन करूनच नगराध्यक्ष पदाचे दावेदार ऐनवेळी एक महिला ? होऊ शकते अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुसरी कडे सेनेला सत्तेत खारीचा वाटा मिळाला नाही तर सत्तेचा लपंडाव होऊ शकते यावेळी काँग्रेस वेगळी भूमिका घेत सत्ता स्थापन करण्याचेही मनसुबे आखत आहे.सत्ता कुठल्याही परिस्थितीत बसविण्यासाठी वेगवेगळ्या खेळीची व्युव्हरचना येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.मारेगाव नगरपंचायत सत्तेच्या राजकीय सारीपाटाचा खेळ तूर्तास खासदार बाळू धानोरकर यांच्या कोर्टात असून अवघ्या दिवसातच सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग मारेगावातही उतरविण्याच्या हालचालीला कमालीचा वेग आला आहे.यात इतर राजकीय पक्षाच्या 'काही' नगरसेवकांनाही सोबत घेऊन सत्तेचा सारीपाट मजबूत करण्यावरही भर देण्याची व्युव्हरचना आखण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.