लग्नाचे आमिष दाखवत वारंवार लैंगिक शोषण
आरोपीला 3 दिवसाची पोलीस कोठडी
वणी :- प्रतिनिधी
अल्पवयीन पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत मागील तीन वर्षांपासून वारंवार लैंगिक शोषण चालू होते . सातत्याने होणारा त्रास सहन न झाल्याने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
त्या दोघात प्रेम संबंध जुळले लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारिरीक शोषण करू लागला. जेव्हा हवं तेव्हा तो तिचा उपभोग घेत होता. त्यातच तो जबरदस्ती करायला लागला. घटनेच्या दिवशी दि. 10 जानेवारीला रात्री 9 वाजता तो पुन्हा पीडितेच्या घरी पोहचला आणि बळजबरीने तिला बाहेर जाण्यासाठी आग्रह धरला तिला मारहाण करत आई व आजोबाला शिवीगाळ केली.
घडलेल्या प्रकारामुळे घरची मंडळी प्रचंड घाबरली व थेट ती व तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले. मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या त्रास बद्दल रीतसर तक्रार दिली त्या नुसार आरोपी गणेश वरारकर वय (२१) याला अटक करण्यात आली असून त्याचेवर भादंवि च्या कलम 376 (2) (3) (J)(N), 452, 323, 506 व सहकलम 4, 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.