Type Here to Get Search Results !

मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न

खळबळजनक...

मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न

🔸मारेगाव तालुक्यात वाळू माफियांची दादागिरी
🔸मंडळ अधिकाऱ्यांच्या दबंगगिरी पुढे वाळू माफियां नतमस्तक
🔸मंडळ अधिकाऱ्याचा बोनेटवर बसून धक्कादायक प्रवास

 संग्रहित छायाचित्र 
मारेगाव : कैलास ठेंगणे
तालुक्यातील वाळू घाटाचे लिलाव न झाल्यामुळे वाळू घाटासह नाल्यातील वाळूवर माफियांनी चांगलाच हैदास घातला आहे. ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगावर थेट वाळूमाफियांनी ट्रॅक्टर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार आज 18 जानेवारी रोजी दीड वाजताच्या सुमारास दापोरा शिवारात घडला. जीवघेणा प्रकार झाल्यानंतर संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी न डगमगता दोन ट्रॅक्टर वर कारवाई करत स्वतः ट्रॅक्टरच्या समोरील बाय नेट वर बसून प्रवास करीत हे वाहने तहसीलला लावले.या धडाकेबाज कारवाईने दबंग अधिकाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कुंभा महसूल मंडळाअंतर्गत येत असलेल्या कोसारा घाटातून वाळूतस्करी खुलेआम आणि सर्वश्रुत सुरू आहे. दररोज घाटातुन वाळू तस्कर तस्करी करीत उपसा करीत आहे. ही तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने एक पथक तयार केले. मात्र या पथकालाही तस्कर गुंगारा देत आहे .अशातच आज मंडळ अधिकारी अमोल गुगाने हे आपल्या कार्यक्षेत्रात कर्तव्यावर होतें आपल्या महसूल मंडळतील दापोरा शिवारात कर्तव्यावर होते . या दरम्यान त्यांना एका पाठोपाठ तीन ट्रॅक्‍टर वाळूची तस्करी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. मात्र समोरील अज्ञान ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला. ते समयसुचकतेने बाजूला सरले आणि मोठा अनर्थ टळला. दरम्यान संबंधित ट्रॅक्टर सैराट पळाले .यात मंडळ अधिकाऱ्यांच्या थोडक्यात जीव बचावला. घडलेल्या प्रकाराची माहिती तहसीलदार दीपक पुंडे यांना देताच त्यांनी तात्काळ पटवारी उत्तम घोटकर व दोन पोलीस शिपाई घटनास्थळी पाठविण्यात आले .संबंधित दोन्ही ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली हे दोन्ही ट्रॅक्टर चिंच मंडळ येथील रामदास चौधरी व अनिकेत झाडे यांच्या मालकीचे आहे. वृत्त लिहिस्तोवर या संदर्भातील पोलिसात तक्रार झाली नव्हती.


सुरुवातीला ट्रॅक्टर सरळ माझ्या अंगावर आणण्याचा वाळू माफिया कडून प्रयत्न झाला मात्र माझ्या समयसुचकतेने मी सुदैवाने बचावलो.भरधाव वेगाने असलेला हा ट्रॅक्टर पसार होण्यात यशस्वी झाला.त्याचा शोध घेण्यास प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.लवकरच त्याच्या मुसक्या आवळण्यात आम्हास यश मिळेल.असा आशावाद मंडळ अधिकारी ए.वाय. गुघाणे यांनी " विदर्भ सर्च न्यूज " शी बोलतांना व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies