काँग्रेस ५ ; सेना - भाजप प्रत्येकी ४; मनसे ०२ ; राष्ट्रवादी १तर अपक्ष १
🔸वंचित , शहर विकास आघाडीला भोपळामारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव शहराच्या राजकारणाची उत्कंठा शिगेला पोहचलेली नगरपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून मतदार राजांनी कुणालाही स्पष्ट बहुमत न देता काँग्रेस ला पाच ;सेना- भाजपला प्रत्येकी चार , मनसेला दोन , राष्ट्रवादी एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे.वंचित समर्पित शहर विकास आघाडीला भोपळा मिळाला आहे.
मारेगाव शहराच्या राजकारणाची उत्कंठा शिगेला पोहचलेली नगरपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून मतदार राजांनी कुणालाही स्पष्ट बहुमत न देता काँग्रेस ला पाच ;सेना- भाजपला प्रत्येकी चार , मनसेला दोन , राष्ट्रवादी एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे.वंचित समर्पित शहर विकास आघाडीला भोपळा मिळाला आहे.
आज लागलेल्या निकालात प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसच्या अनिता नत्थु परचाके (११५) , दोन मध्ये सेनेच्या माला गोकुळदास बदकी (१५७), तीन मध्ये अपक्ष उमेदवार नंदेश्वर आसुटकर (१०५), चार मध्ये मनसे च्या शेख अंजुम शेख नबी (८२),पाच मध्ये सेनेच्या वर्षा किशोर किंगरे (१७३) , सहा मध्ये भाजप च्या सौ. हर्षा महाकुलकार (१९८); सात मध्ये काँग्रेसच्या छाया किनाके (१००) ; आठ मध्ये भाजप चे वैभव पवार (७८); नऊ मध्ये सेनेचे मनीष मस्की (१३८ ) ; दहा मध्ये काँग्रेस च्या सुनीता किन्हेकर (१११) ; अकरा मध्ये काँग्रेसच्या थारांगना खालिद पटेल (१४४); बारा मध्ये राष्ट्रवादी चे हेमंत नरांजे (९४); तेरा मध्ये मनसे चे अनिल गेडाम (७०), चौदा मध्ये काँग्रेसचे आकाश बदकी (१०२) ; पंधरा मध्ये भाजप च्या सुशीला भादीकार (८३) , सोळा मध्ये भाजप चे राहुल राठोड (८४) तर सतरा मध्ये सेनेचे जितेंद्र नगराळे (८९) मते घेऊन विजयी झाले.
मारेगाव शहरात नगरपंचायत निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविली होती.जवळपास सर्वच प्रभागात घोडेबाजाराला कमालीचा उत आला होता.या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपने निसटता विजय मिळविला.प्रभाग तीन मध्ये अपक्ष उमेदवाराने मुसंडी मारत राष्ट्रवादी व काँग्रेस ला धूळ चारली.बारा मध्ये विद्यमान नगरसेवकास पराभव पत्करावा लागला.तर अनेक प्रभागात आज लागलेल्या निकालावरून एकतर्फी विजयाची मालिका चालली.या निवडणुकीत उतरलेला वंचित समर्पित शहर विकास आघाडीला भोपळा मिळाला.