मारेगावात तालुक्यात कोरोना संसर्गाचा शिरकाव
🔸 तालुक्यात ९ तर शहरात ४ बाधित🔸 नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा
मारेगाव : दीपक डोहणे
कोरोना संसर्गजन्य रोगाची एन्ट्री आता मारेगाव शहरासह तालुक्यात होऊन धोक्याची घंटा वाजली आहे.कोरोना संसर्गाने आता मारेगाव तालुक्यात शिरकाव केल्याने शहरात चार तर तालुक्यात एकूण ९ बाधितांची नोंद झाल्याने तालुक्याची चिंतेकडे वाटचाल सुरू झाली.

कोरोना संसर्गाचा फैलाव सर्वत्र होत असतांना यात मारेगाव तालुका अपवाद नाही.मागील तीन वर्षांपासून सलग कोरोनाचा संसर्ग मागावर असतांना यंदा मारेगाव तालुक्यात जानेवारीतच एन्ट्री केली.त्यामुळे नागरिकांत भीतीचे सावट गडद होण्याची संभाव्य शक्यता बळावली आहे.
आज गुरुवारला प्राप्त माहितीनुसार मारेगाव शहरात चार कोरोना बाधितांची तर तालुक्यात पाच बाधितांची नोंद झाली.त्यामुळे मारेगाव तालुक्याची चिंताग्रस्त स्थिती निर्माण होत आहे.नागरिकांनी सतर्कता बाळगून काळजी घेण्याची गरज आहे.