नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत द्या
🔸 अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा🔸 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.यापूर्वीच आर्थिकदृष्ट्या लयास गेलेल्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व्हेक्षण करून हेक्टरी वीस हजार रुपये तात्काळ मदत करावी यासाठी मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाधिकारी यांचेकडे साकडे घातले आहे.

मारेगाव तालुक्यात काही भागात मागील दोन दिवसापूर्वी अकाली पाऊस व गारपिटीचा तडाख्याने खरिपातील तूर व फरताळीच्या कपाशीचे प्रचंड नुकसान झाले.यासोबत रब्बी पिके असलेली गहू आणि चनाही उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा कमालीचा हतबल झाला.नैसर्गिक संकटाने यापूर्वीच कपाशी व तूर पिकांचे उत्पादनात घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पुरते कोलमडले आहे.आर्थिक उभारी देण्यासाठी शेतकऱ्यावर ओढवलेल्या संकटाने नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ सर्वेक्षण करून हेक्टरी वीस हजार रुपये मदत करावी या प्रमुख मागणीसाठी मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अंकुश माफुर , रा.यु.कॉ. चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे , तालुका अध्यक्ष भारत मत्ते, जिल्हा संघटक भास्कर राऊत , शहर प्रमुख मुन्ना शेख , राजू घुमे , आशिष येरने , हेमंत नरांजे , आशिष दानखडे, दीपक राठोड , मारोती पवार यांची उपस्थिती होती.