85 हेक्टर तुर पिकाला गारपिटीचा फटका
🔸तहसीलदारांनी केली नुकसानीची पाहणी
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरामध्ये मंगळवारी रात्री सात वाजता दरम्यान गारपीटसह पाऊस झाला. यावेळी झालेल्या गारपिटीने 85 हेक्टर तूर पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने घराचे व गोठ्याचे नुकसान झाले.माञ जीवित हानी टळली. वादळी वाऱ्यामुळे शेतातील मोठमोठाले वृक्ष कोसळले तसेच शेतातील गहू, हरभरा ,लिंबू ,मोसंबी पिकाचे नुकसान झाले. कपाशीच्या शेवटचा बाराला चांगलाच फटका बसला . तहसीलदार यांनी प्रत्यक्ष भेट देत नुकसानीची पाहणी केली.
परिसरातील कुंभा ,टाकळी , कोठूर्ला या गावांना गारपिटीचा चांगलाच फटका बसला. हातातोंडाशी आलेले पिके गारपिटीचा माराणे मातीमोल झाले. तूर पिकाची मोठा फटका बसला .तुरीचां शेगा फुटून दाने शेतामध्ये जमिनीवर पाडल्याने खराब झाले. तर गारपिटीचा माऱ्याने तुरीचे खराटे झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे महसुल विभागाने 85 हेक्टर तूर पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला. तर कुंभा येथील शेतकरी पांडुरंग आसुटकर यांच्या दोन हेक्टर फळबागेचे मोठे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यासह गारपीट पडल्याने साखरा येथील वसंता तलांडे घरावर झाड पडले तर कुंभा येथील विजय लोहकरे यांच्या गोठ्या वर भलेमोठे वृक्ष उन्मळून पडले. या दोन्ही घटनेत आर्थिक नुकसान झाले. मात्र जीवित हानी टळली.
या नुकसानीची पाहणी तहसीलदार दीपक पुंडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली. यावेळी पटवारी उत्तम घोटकर, गजानन वानखेडे ,संजय सुर्वे ,कृषी सहाय्यक अक्षय सोनुले, सरपंच अरविंद ठाकरे सह आदि उपस्थित होते. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकरयांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.