मारेगाव तालुक्यात कोंबड बाजारावर छापा
🔸४७ हजाराचा मुद्देमाल जप्त🔸इंदिराग्राम येथे कारवाईमारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील इंदिराग्राम परिसरात भरविलेल्या कोंबड बाजारावर मारेगाव पोलिसांनी छापा मारून किमान ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत शनिवारला जप्त केला.या कारवाईत सहा जणांना गजाआड करण्यात आले.
तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या इंदिराग्राम येथील काही अंतरावर असलेल्या टेकडीच्या खाली कोंबड्याच्या झुंजी सुरू होत्या.याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच छापा टाकण्याची व्युव्हरचना आखण्यात आली.पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात जमादार रजनीकांत पाटील , अजय सारवाहन , नितीन खांदवे , जिड्डेवार या पथकाने छापा टाकून कोंबड बाजारातील नगदी स्वरूपातील दोन हजार रुपये , दोन दुचाकी , दोन भ्रमणध्वनी , झुंजीतील दोन कोंबडे असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान या छाप्यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून अनेकांनी घटनास्थळा वरून पोबारा केला.परिणामी तालुक्यात बोटोणी , वेगाव , आकापूर , शिवनाळा , मारेगाव , कुंभा परिसरातील शिवारात छोट्या मोठ्या कोंबड बाजाराला कमालीचा उत आला आहे.