🔸"त्या" पुलाजवळ तळीरामांची तोबागर्दी..
🔸पोलीस प्रशासनाकडून अवैद्य व्यवसाय बेदखलमारेगाव : दीपक डोहणे
तालुक्यातील कोथुर्ला येथील ऐन वर्दळीच्या मार्गावर असलेल्या पुलाखाली अवैध देशी दारूचा व्यवसाय जोमात सुरू असल्याने परिसरातील सामाजिक स्वास्थ्यास प्रचंड धोका निर्माण होत असल्याचा आरोप होतो आहे.परिणामी या व्यवसायात तळीरामांची तोबा गर्दी वाढत असल्याने पोलीस प्रशासनाकडून मात्र हा बहुचर्चित व्यवसाय जाणीवपूर्वक बेदखल होत असल्याचा नागरिक आरोप करित आहे.
मारेगाव तालुक्यातील कोथुर्ला येथील अवैध व्यवसाय धारक हा मागील अनेक दिवसांपासून कोथुर्ला - चिंचमंडळ रस्त्यालगत असलेल्या पुलाखाली देशी दारूची विक्री करीत आहे.गावातील व परिसरातील सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहावे यासाठी अनेकांनी अवैध व्यवसायाला विरोध केला मात्र वरकमाईचा हा गोरखधंद्याला मूठमाती मिळत असल्याने या व्यवसायाने चांगलेच पाय रोवले आहे.
दरम्यान या व्यवसायास परिसरातील कोथुर्ला सह बोरी , दापोरा , चिंचमंडळ येथील तळीराम मोठ्या प्रमाणात येऊन तोबा गर्दी करीत आहे.यामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्यास प्रचंड बाधा निर्माण होत आहे. मागील अनेक दिवसा पासून सुरू असलेल्या व्यवसायावर आजतागायत कारवाई करण्यात आली नसल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.हा बहुचर्चित व्यवसाय कायम बंद करण्यात यावा अन्यथा पोलीस स्टेशनवर धडकण्याचे उग्ररुप नारीशक्ती धारण करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.