🔸केंद्रावर बकालपणा कायम
🔸स्वच्छ भारत मोहिमेला बँकेकडून हरताळ
मारेगाव। : कैलास ठेंगणे
मारेगाव शहरात असलेल्या दोन बँकांचे एटीएम केंद्रांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या केंद्रावर सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी जोर धरत आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या आहे.एटीएम मशीन उचलून ही नेण्याचा घटना घडत आहे .त्यामुळे पोलिस विभागावर अकारण ताण वाढत आहे. पोलीस विभागामार्फत बँकांना वारंवार पत्रव्यवहार करून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करा असे आदेशही देण्यात आले .मात्र शहरातील बँकानी या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पोलिस विभागाची डोकेदुखी वाढत चालली आहे. नव्याने रुजू झालेले ठाणेदार काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
केंद्रावर अस्वच्छतेचा कळस
शहरातील दोन्ही केंद्रावर महिनो गणती साफसफाई केली जात नसल्यामुळे केंद्रावर सर्वत्र अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे येथे स्वच्छ भारत चा नाऱ्याला हरताळ फासल्याचे दिसत आहे.
सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये बिघाड
शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया एटीएम केंद्रावरील मशीन मध्ये बिघाड झाल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दिवाळीच्या पावन पर्वावर ग्राहकांना व्यवहार करताना मोठी अडचण येत असल्याने नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे.