🔸बापलेकासह तिघांना अटक
🔸ऐन दिवाळी दिवसाला मामाकडून भाच्याला बेदम मारहाण
देशातील सर्वात मोठा व महत्वाचा सण असलेला दिवाळीच्या दिवसाला मामा व त्याच्या लेका कडून भाच्याला लाठीकाठ्याने बेदम मारहाण करीत खून करण्याचा प्रयत्न केल्याने मामासह दोन मुलांना अटक करण्यात आली.ही घटना गुरूवारला संध्याकाळी ७.३० वाजताचे दरम्यान हिवरी (बेडा ) येथे घडली.
तालुक्यातील हिवरी येथील वसंता घोसले या मामाने भाचा प्रवीण शायनीक काळे(३२) यास उसने पैशाच्या मागणीवरून वाद केला.शाब्दिक खडाजंगी सुरू असतांना वसंता यांचे दोन मुले काठ्या घेऊन आले.तीघा बापालेकांनी प्रवीण यास बेदम मारहाण केली.या वादात प्रवीण हा गंभीर जखमी झाला.
घटनेची तक्रार मारेगाव पोलिसात दाखल होताच वसंता घोसले (५२) , तिरंत वसंता घोसले (३२) व दिलीप वसंत घोसले (२६) या बापलेकांना खुनाचा प्रयत्न करणारा कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. जखमी प्रविणवर उपचार सुरू आहे.