🔹️नागरिकांची लक्षणीय उपस्थिती
मारेगाव:-येथील न्यायालयात नेहरू जयंती दिनी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचा समारोपीय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी व फौजदारी न्यायाधीश निलेश वासाडे होते.प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार राजेश पुरी,गटविकास अधिकारी सुनील वानखेडे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष एड. एन.एस.हुसैनी,जेष्ठ विधिज्ञ एड.पि. एम. पठाण,एड. एच. टी. पावडे,एड. आशिष पाटील,एड.हूमेरा शरीफ मंचावर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गांधी जयंती पासून शुभारंभ झालेल्या शिवीराचे सलग 44 दिवस संपूर्ण मारेगाव तालुक्यातील विविध गावात कार्यक्रम झाले.प्रत्येक गावात गावकऱ्यांनी शिबिरांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या 44 दिवसात पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, जनजागृती रॅली,पोलीस पाटलांना मार्गदर्शन, नगर पंचायत मध्ये शिबीर, ऑनलाईन मार्गदर्शन, न्यायालयात पक्षकारांना मार्गदर्शन, पत्रक वाटप,महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना कायद्याची माहिती, मानसिक आरोग्यावर तज्ञांचे मार्गदर्शन आदी भरगच्च कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
या सर्व यशस्वी कार्यक्रमाची सांगता आज नेहरू जयंती ला न्यायालयात झाली. याप्रसंगी विधी स्वयंसेवक नागेश रायपुरे, अशोक कोरडे, प्रगती मुरस्कर, एड. नलिनी कोडापे, भाग्यश्री बदखल, काजल शेख,करिश्मा किन्हेकार, मेघा कोडापे, जमादार द्यानेश्वर ढुमने,लिपिक सुरज टेंभरे,पांडुरंग वासाड, यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एड. मेहमूद पठाण यांनी केले.
कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.